मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी

Exif_JPEG_420

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड हे पर्यटनाचे क्षेत्र असल्याने पर्यटकांची पावले आपोआप मुरुड समुद्रकिनारी वळत असतात. आज शेकडोंच्या संख्येने विविध जिल्ह्यांतून पर्यटक मुरुड समुद्रकिनारी दाखल झाले आहेत. बुधवारी सकाळपासून पारा 40 सेल्सिअसवर पोहोचला होता. या वाढलेल्या तापमानामुळे पर्यटकांनी स्वच्छ निळ्याशार आणि सुंदर समुद्रात पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला, तर कोणी बनाना राईट्स, घोडागाडी, बाईकवर सवारी केली. त्याचवेळी किनार्‍यावर क्रिकेट खेळण्याचा आनंदही पर्यटकांनी लुटला.

Exit mobile version