देवकुंडवर पर्यटकांची तुफान गर्दी
। माणगाव । प्रतिनिधी ।
पाटणूस ग्रामपंचायतीचे हद्दीतील साहस आणि सौंदर्याने ओथंबलेल्या देवकुंड धबधबा निसर्ग प्रेमींसाठी खळखळून वाहत आहे. पर्यटकांना कॉलीफोर्निया पेक्षाही आकर्षीत करणारे येथील डोंगर दर्या दाट घनदाट झाडी, नदीतून वाहणारे बारमाही झुळूझुळू पाणी, पशु, पक्षी, उंच डोंगरावरून धुक्यातून रस्ता काढत हजारो मिटर वरून पडणारे पाणी आणि त्या पडणार्या पाण्यात तयार झालेले फेसाळ धबधबे या निसर्गात येणारा पर्यटक निसर्ग प्रेमी यांना आस लागत आहे. येथे पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे देवकुंडला पर्यटन क्षेत्रात नवी ओळख मिळाली असून ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते जगाच्या नकाशावर पोहोचले आहे.
पनवेल महापालिकेला मिळणार आणखी एक आयुक्त?
देवकुंड हे पर्यटकांना आकर्षीत करीत आहे. तेवढेच ते धोक्याचे ही आहे. या ठिकाणी जाताना रस्त्यात मोठी नदी असून या नदीत मोठ्या प्रमाणात पाणीही जोरात वाहते त्यामुळे या पूर्वी देवकुंड बघण्यास गेलेल्या कॉलेजच्या विद्यार्थांचा वर्षा सहलीला गेलेल्या विद्यार्थांना येथेच अडकून पडावे लागले होते. तर देवकुंड धबधब्यात पोहताना अनेकांचे बळी गेले होते. त्याची पुनरावृत्ती घडू नये यासाठी देवकुंडला माणगाव उपविभागीय अधिकारी यांनी 144 कलम लागू केला. मात्र स्थानिक पर्यटकांना सोशल मिडिया फेसबुकचे माध्यमातून बोलावून बुकिंग राहणे, जेवणाची सोय करून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे येथे शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवसात यात्राच भरत आहे. त्यामुळे 144 कलमांची पर्यटकांकडून पायमल्ली होत आहे. याकडे पोलीस प्रशासनांकडून कोणतीही कारवाई का होत नाही ? हा प्रश्नच उभारला जात आहे.
कोव्हिड सारख्या महामारीमध्ये पर्यटक तसेच वर्षासहलीसाठी निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात येथे येतात. त्यामुळे कोविडचा प्रादुर्भाव रायगड जिल्ह्यात अधिक होण्याची शक्यता नागरीकातून बोलताना व्यक्त होत आहे. हे पर्यटक आपल्या खाजगी वाहनातून येतात. शुक्रवारी रात्री वस्तीला परिसरातील गावातील खोल्या, हॉल, हॉटेलमध्ये वास्तव्य करून शनिवारी पहाटे काही पर्यटक तर काही दिवसभरात कधीही ये जा करतात. रविवारी तसेच अन्यसुट्ट्या दिवसा तर पर्यटकांची तोबा गर्दी असते. या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत असल्यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात येत आहे. यांचेवर कारवाई कोण करणार हा प्रश्नच आहे.