गारंबीवर पर्यटकांची रेलचेल

| आगरदांडा | प्रतिनिधी |

निसर्गसौंदर्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरूड तालुक्याला प्रतिवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. फेसाळणारे धबधबे, गार वारा, उंच डोंगरावर धुक्यातील झालरीतून दिसणारी हिरवाई, अशा सगळ्या रोमांचकारी क्षणांना अनुभवण्यास पर्यटकांना मुरूड तालुक्यातुन पर्यटन क्षेत्रातुन मिळत असतो. त्यापैकी मुरुड शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गारंबी धबधबा याठिकाणी जाताना नागमोडी वाटा, कच्चा रस्ता, पक्षांची किलबिलाट, हिरवा शालू नेसलेल्या टेकडय़ा, वृक्ष, वेली या निसर्गाच्या सानिध्यामुळे या धबधब्याचे सौदर्य अजूनच खुलून दिसत आसतो. असे आल्हाददायक वातावरण पर्यटकांना एक मेजवानीच ठरत असते. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी यावेळी पर्यटकांची स्थानिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होतांना दिसून येत आहे.

Exit mobile version