सुगडी खरेदीसाठी महिलांची गर्दी

Exif_JPEG_420

| आगरदांडा | प्रतिनिधी |
मंकरसक्रांत हा सण नवीन वर्षातील पहिला सण येत्या रविवारी असून, यादिवशी ङ्गतीळगुळ घ्या, गोड गोड बोलाफ असा संदेश देत प्रेम, आपुलकीशिवाय एकमेकांशी आदर व्यक्त करण्याची प्रथा रूढ आहे. या पूजेकरिता सुगडी, तिळगुळ, ऊस, हळद-कुंकवाच्या वस्तुंसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी मुरुड बाजारपेठेत महिलांंची गर्दी दिसून येत आहे.

सुवासिनींचा मंकरसक्रांत हा महत्त्वाचा सण असल्याने या दिवशी वाणाला अधिक महत्त्व आहे. हा सण पंधरा दिवस चालतो. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार आपल्या घरी हळदी-कुंक कार्यक्रम ठेवून आपल्या नात्यातील सुवासिनींना बोलवून तिची रितीरिवाजप्रमाणे तिची पूजा करुन तिला हळदकुंकू वाण दिले जाते. त्याबरोबर संसाराला लागणार्‍या भेटवस्तू यादिवशी दिल्या जातात.

Exit mobile version