प्रतापगडाची प्रतिकृती पाहण्यासाठी गर्दी

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत शहरालगत असलेल्या हालीवली गावातील भावेश बोराडे या तरुणाने दिवाळी सणामध्ये बनविलेल्या प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी गडप्रेमी यांनी गर्दी केली आहे. दरम्यान, भावेश बोराडे यांच्या कुटुंबीयांनी किल्ल्याची प्रतिकृती देव दिवाळी पर्यंत तशीच ठेवण्याचा निर्णय घेतला. भावेश यांनी 20 फूट लांबीचा प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. त्याने वडिलांचे मदतीने मातीपासून प्रतापगड किल्लाची प्रतिकृती साकारली असून त्यात जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला.

रात्रीच्या वेळेस या भव्य प्रतापगड किल्ल्यावर दिपोत्सव करून किल्ला पणत्याने उजळून टाकला होता. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती, भगवा झेंडा, मावळे, झाडी झुडपे, पाषाण रुपी दगड बघण्यास सर्वांचेच आकर्षण ठरत आहे. प्रतापगड किल्ल्याची पाहण्यासाठी परिसराबरोबरच संपूर्ण कर्जत तालुक्यातून अनेक शिवप्रेमी, महिला वर्ग, विद्यार्थी, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक भेटी देत आहेत. राजिपचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या वतीने आयोजित किल्ले बनविण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. किल्ला सर्वांनी पहावा यासाठी भावेश बोराडे, सुरेश बोराडे, प्रमिला सुरेश बोराडे यांनी ही प्रतिकृती देव दिवाळी होईपर्यंत खुली ठेवली आहे.

Exit mobile version