। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शनिवारी सकाळपासून मुंबई, पुणे, सातारा, नाशिक या जिल्ह्यातून राजपुरी जेट्टीवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. शनिवार-रविवार, सुट्ट्यांचे दिवस आणि पर्यटन हंगामात किल्ल्यावर भेट देणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढते. शिडीच्या बोटीद्वारे किल्ल्यावर पोहोचण्याचा अनुभव, ऐतिहासिक वास्तू, मजबूत तटबंदी आणि समुद्राच्या मधोमध असलेले त्याचे अनोखे स्थान यामुळे पर्यटक आकर्षित होतात. इतिहासाच्या दृष्टीनेही हा किल्ला महत्त्वाचा आहे. त्यामुळे इतिहासप्रेमीदेखील मोठ्या संख्येने येथे येतात.
जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी
