हमरापूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम

| हमरापूर | प्रतिनिधी |

पेण तालुक्यांतील हमरापूर येथे ग्रामपंचायतीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास हमरापूर ग्रामपंचायतीचे सरपंच राकेश दाभाडे, उपसरपंच ओमकार पाटील, माजी उपसरपंच संजय पाटील, सदस्य युवराज म्हात्रे, राजेंद्र शेदवळ, ओमकार पाटील, सदस्या पूजा पाटील, पायल सुर्वे, सायली मांडलेकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पल्लवी भोईर, साखरे मॅडम, मयूर सुर्वे, सतीश पाटील यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी हमरापूर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर करीत सर्वांचीच मने जिंकली. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरपंच राकेश दाभाडे, उपसरपंच ओमकार पाटील व सदस्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version