ग्रामपंचायतीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम

| हमरापूर । वार्ताहर ।
पेण तालुक्यांतील हमरापूर येथे ग्रामपंचायतीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास हमरापूर ग्रामपंचायतीचे राकेश दाभाडे, संजय पाटील, युवराज म्हात्रे, राजेंद्र शेदवळ, ओमकार पाटील, पूजा पाटील, पायल सुर्वे, सायली मांडलेकर, विठोबा पाटील, पल्लवी भोईर, अपर्णा बंद्री, रमेश पाटील यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी हमरापूर प्राथमिक शाळा व खारसापोली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर करीत सर्वांचीच मने हमरापूर विभागाचे युवा नेतृत्व व जिल्हा परिषदेचे माजी सभापती स्व. पिंट्याशेठ पाटील यांच्यावर आधारीत नाट्यगीत सादर करताच उपस्थित सर्वच ग्रामस्थांचे डोळे पाणावले. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना राकेश दाभाडे, संजय पाटील व सदस्यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version