| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर परिसरात मोबाईल दुरुस्तीच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने गंभीर स्वरूप धारण केले व त्यातून ग्राहकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मोबाईल दुकान चालकाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव अहमद मनिहार असे आहे. जयेश चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी आपला मोबाईल रिपेअरिंगसाठी आरोपीच्या दुकानात दिला होता. मोबाईल दुरुस्ती वेळेत न झाल्याने चौधरी यांनी कारण विचारले असता आरोपी आणि ग्राहक यांच्यात वाद झाला. वाद वाढताच आरोपीने तक्रारदाराला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आणि मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
किरकोळ कारणावरून ग्राहकाला मारहाण
