| नेरळ | प्रतिनिधी |
गणेशोत्सव सुरू होत असताना गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर प्रत्येक घरोघरी आवाज येतो तो आरतीचा. आरतीसाठी सर्वांना आवश्यकता असते ती चर्मवाद्य यांची आणि अशा वाद्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड दिसून येत आहे.
प्रामुख्याने गणेशोत्सव काळात पारंपरिक चर्मवाद्यांना मोठी मागणी वाढली आहे. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर भजन मंडळ, तसेच घरगुती आरत्या आणि वाद्यप्रेमी ढोलकी, तबला, पखवाज, मृदुंग या साहित्याची दुरुस्ती किंवा नवीन खरेदी करण्यासाठी भाविक धावपळ करीत होते. या वाद्यांची दुरुस्ती व तयारी करण्यासाठी धाव घेत आहेत. त्याचवेळी नवीन मृदुंग आणि वाद्य यांच्या खरेदीसाठी भाविक बाजारात भटकत असतात. त्याचवेळी दारोदार येणारे वाद्य विक्रेते यांच्याकडून देखील गणेश भक्त लहान आकाराची वाद्य खरेदी करताना दिसत आहेत.
तबला आणि मृदुंग दुरुस्तीसाठी कर्जत परिसरात गेल्या 100 वर्षांची परंपरा जपणारे रमेश तबलेवाले हे या क्षेत्रातील मानाचे नाव आहे. कर्जत रेल्वे स्टेशनजवळील जुन्या एसटी. डेपो लगत असलेल्या त्यांच्या कार्यशाळेत सध्या मोठी गर्दी होत आहे. कर्जत शहरातील महावीर पेठेतील लहान दुकानापासून सुरू झालेला हा व्यवसाय आता जुन्या एस.टी. स्टँडजवळ मोठ्या प्रमाणावर उभा राहिला आहे. रमेश तबलेवाले यांच्या हातातून फक्त वाद्यांची दुरुस्तीच नव्हे, तर सांस्कृतिक वारशाचे जतनही सातत्याने केले जात आहे.
चर्मवाद्य दुरुस्तीसाठी ग्राहकांची रीघ
