| पेण | प्रतिनिधी |
सायबर फसवणुकीची रक्कम प्राप्त करण्यासाठी बँक खाते उघडून ते खाते इतर खात्यांमध्ये रक्कम हस्तांतरित करण्यासाठी वापरण्यास परवानगी दिल्याप्रकरणी पेण पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दि. 6 डिसेंबर 2025 ते दि. 2 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पेण शहरातील देवआळी परिसरातील एका रहिवाशाने आणि पाली, सुधागड येथील एका व्यक्तीने संगनमत करून सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. या खात्यामध्ये 2025 ते 2026 या कालावधीत मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीची रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर ही रक्कम अन्य बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यास परवानगी देऊन आरोपींनी सायबर फसवणुकीस जाणीवपूर्वक सहाय्य केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहवा धुपकर अधिक तपास करीत आहेत.
पेणमध्ये सायबर फसवणूक, दोघांवर गुन्हा
