| पनवेल | वार्ताहर |
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय मोहिते, अप्पर पो. आयुक्त साकोरे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम सुरु आहे.
सीबीडी पोलीस ठाण्यामार्फत पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 उपायुक्त विवेक पानसरे, सहा आयुक्त तुर्भे विभाग गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, पोनि हनिफ मुलाणी यांनी सायबर सुरक्षा जनजागृती सायकल रॅली (12 कि.मी.) पोलीस ठाण्याच्या हद्दीत काढण्यात आली. यामध्ये पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, निवृत्त पोलीस अधिकारी, पोलीस मित्र व विद्यार्थी असे 180 सायकलस्वार सहभागी झाले होते. यासाठी डीकेथलोन व युलू यांनी 170 सायकली पुरवून सहकार्य केले. या रॅलीबाबत नागरिकांनी आणि डी.वाय. पाटील व भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कौतुक केले.






