महाविद्यालयात सायबर सुरक्षा मार्गदर्शन

। कोर्लई । वार्ताहर ।

मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे रायगड सायबर क्राईम्‌‍ पोलिस ठाणे-अलिबाग व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या संयुक्त नियमाने प्राचार्य डॉ.एम.ए.नगरबावडी यांच्या अध्यक्षतेखाली सायबर सुरक्षा व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

मुरुड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.नगरबावडी, उपप्राचार्य डॉ.विश्वास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी यावेळी उपास्थित होते. सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आजच्या संगणकीय युगात संपूर्ण जगात तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्ट फोन आहे तर ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रभाव वाढले आहेत.

हे करीत असताना कोणती काळजी घ्यावी, जेणे करून ऑनलाइन होणारे फसवे व्यवहार थांबतील. तसेच, सायबर गुन्हयाचे प्रमाण कमी करता येईल व नागरिकांची होणारी फसवणूक टाळता येईल, असे रायगड जिल्हा समन्वयक अद्वैत जाधव व विश्वास मते यांनी संगतिले. तर मोबाइलचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा.डॉ.नारायण बागुल यांनी मानले.

Exit mobile version