| खोपोली | प्रतिनिधी |
लायन्स क्लब खोपोली तर्फे वर्षभर समाज उपयोगी अभिनव उपक्रम राबवले जात असतात शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात लायन्स क्लबचे कार्य कौतुकास्पद असते. लायन्स क्लब ऑक्टोंबर सर्विस विकच्या संकल्पनेतून सुरक्षित व सतर्क समाज घडवण्यासाठी जनजागृती व प्रशिक्षणातून सायबर सुरक्षा सेमिनाराच्या माहिती तंत्रज्ञाना बाबत माहिती देण्यासाठी सहाय्यक पोलिस निरिक्षक हरेश काळसेकर व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ रायगड मार्केटिंग प्रमुख विश्वास मते यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तंत्रज्ञानातून लाभ, दोष, सतर्कता, माहितीतून आपल्या दैनंदिन जीवनात कसे प्रलोभनापासून दूर राहता येईल, त्यावर मात करता येईल आणि मोबाईल, सोशल मीडियावर आपल्या सुरक्षित व खाजगी आयुष्या बाबत गोपनीयता ठेवून सतर्क राहता येईल यासाठी चलचित्र, सायबर सुरक्षा लिंक, आपत्कालीन नंबर अश्या अनेक मुद्द्यावर सविस्तर माहिती दिली.
लायन्स क्लब तर्फे अपघातग्रस्त टिम चा सन्मान सत्कार करून विमा सुरक्षा देत आपत्कालीन विमा पोलिसी वितरण सहाय्यक पोलिस निरिक्षक हरेश काळसेकर,लायन्स अध्यक्ष अतिक खोत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश उत्सवामध्ये पर्यावरणा बाबत जनजागृती व्हावी यासाठी अनेक सामाजिक अभिनव उपक्रम राबवत स्पर्धा परीक्षा घेतल्या होत्या त्यामध्ये विजेत्यांना सन्मान सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या.
स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची मानकरी क्षितिजा मरागजे व एशियन पावर लिफ्टिंग फेडरेशन 74 गटात द्वितीय पारितोषिक मिळविल्याबद्दल अक्षयक्षण मोघन यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला
यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष लायन अतीक खोत, लायन दीपेंद्रसिंह भदोरीया, लायन सचिव दीपाली टेलर, लायन निजामुद्दीन खोत, प्रोजेक्ट चैरमेन लायन जीतेंद्र परदेशी, लायन दिलीप पोरवाल, लायन रमेश पाटील , लायन नारायण कट्टी, नगेंद्र केजरीवाल ,महाराष्ट्र ज्ञान महामंडळ महेंद्र मते, लायन विकास खुरपडे, लायन अल्पेश शाह, लायन नगेंद्र केजरीवाल, लायन शैली मेहता, लायन स्वाती नाईक, लायन नरेंद्र गावडे, लायन शेखर जांभळे, उद्योजक अबू जळगावकर, अपघात ग्रस्त संस्था प्रमुख गुरुनाथ साठेलकर, संदीप पाटील, राजेश अभानी, समशुद्दीन शेख, पत्रकार साबीर शेख, संदीप ओव्हाळ, अशपाक लोगडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.