बाळसई येथे दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

| सुकेळी | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यात सर्वत्र दहिहंडी उत्सव अतिशय उत्साहात व जल्लोषमय वातावरणात साजरा करण्यात आला. नागोठणे विभागातील बाळसई गावामध्ये देखिल दहिहंडी उत्सव अंत्यंत उत्साहमय वातावरणात पार पडला. जवळ-जवळ आठवड्याभरापासुन विश्रांती घेतलेल्या पावसाने देखिल गोविंदांवर कृपा करीत पावसाने सकाळपासूनच दमदार हजेरी लावल्यामुळे गोविंदांमध्ये उत्साह संचारला होता.दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखिल बाळसई गावातील बाळगोपाळांनी दहिहंडीचा मनसोक्त आनंद लुटला. गावातील अनंत ठमके यांच्याकडून बांधण्यात आलेल्या मानाची हंडी तीन थर लावुन बाळ गोविंदांनी फोडली. गोविंदांनी साखळी पकडुन ढोल-ताशाच्या गजरात तसेच बोल बजरंग बळी की जय च्या ताळावर सर्वच गोविंदांनी ठेका धरला होता. त्याचप्रमाणे पारंपारिक परंपरा म्हणून सुरू असलेल्या अनेक कान्होबा भक्तांच्या अंगात कान्होबाचे वारे देखिल आले होते. मानाची हंडी फोडल्यानंतर गावामध्ये ईतर बांधण्यात आलेल्या 5 ते 6;दहीहंड्या फोडण्यात आल्या. बाळसई गावातील हा दहिहंडी उत्सव गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला.

Exit mobile version