। पनवेल । ग्रामीण वार्ताहर ।
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम“ “गोविंदा रे गोपाळाच्या“ गजरात मंगळवारी ( ता. 27) तालुक्यातील धानसर गावात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. भजन कीर्तनाच्या गजरात घरोघरी जाऊन दहीहंडी फोडण्यात येत असून,गावातील लहान मोठे सर्वच दहीहंडीच्या उत्सवात सामील झाल्याचे या वेळी पाहायला मिळाले. पनवेल पालिकेत समाविष्ठ धानसर गावातील ग्रामस्थ शहरीकरणाच्या कचाट्यात आज देखील गावाचा ग्रामीण बाज टिकवून आहेत. गावात आज देखील पारंपारिक पद्धतीने सर्वच उत्सव उत्सहात साजरे करण्यात येतात. या वेळी भजन किराणाच्या गजरात गावातील घरोघरी जाऊन घरा बाहेर बांधण्यात आलेल्या दहीहंडी फोडण्यात येतात. तत्पूर्वी आदल्या रात्री गावातील हनुमान मंदिरात बाळश्रीकृष्णाच्या मूर्तीची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चना केली जाते. रात्री बाराच्या सुमारास कृष्णजन्मोत्सव साजरा करून प्रसादाच्या स्वरूपात साखर आणि सुंठोर्याचे वाटप करण्यात येत. त्याच प्रमाणे दही पोह्याचा काला करून मंदिरात उपस्थित भक्तामध्ये त्याचे वाटप केले जात.