लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

खेड तालुक्यातील भरणे येथील एका इमारतीत शुक्रवारी (दि.26) लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

भरणे येथील सद्गुरु रेसिडेन्सी ‘बी’ विंगमध्ये वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीच्या सदनीकेचा मुख्य लोखंडी सेफ्टी दरवाजा तसेच आतील लाकडी दरवाजा धारदार हत्याराने तोडत चोरट्यांनी सदनीकेत प्रवेश केला. आंत घुसताच अज्ञात चोरट्यांनी तब्बल 2 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version