| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गोगालेंना पालकमंत्री पदाची स्वप्न दाखविणारे आमदार दळवी यांनी देखील मंत्री पदाची स्वप्ने बघण्यास सुरुवात केली आहे. दळवींचे बगलबच्चे यांनी एका कार्यक्रमात दळवींना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे गोगावलेंना मंत्रीपदासाठी दळवींची अडकाठी येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावे, यासाठी आमदार दळवी यांनीच मागणी करीत तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये भांडण लावून देण्याचे काम केल्याची चर्चा आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमात गोगावलेच पालकमंत्री अशा बतावण्या करीत गोगावलेंना पालकमंत्री पदाचे स्वप्न दाखविण्यात आले. दळवींच्या या बातांना गोगावले चांगलेच फसले. ते वारंवार पालकंत्री पदाचे स्वप्न पाहू लागले. वेगवेगळ्या कार्यक्रमात मीच पालकमंत्री होणार असे जाहिर करू लागले. परंतु, गोगावलेंनीच त्यांचे गेल्या चार वर्षात हस करून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे.
एका बाजूला दळवींनी मागील सहा महिन्यापुर्वी तटकरेंना गुरु मानीत त्यांचे गोडवे गायले आहे. मुरूडमधील एका कार्यक्रमात सुनील तटकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतल्याचे दळवी यांनी सांगितले. त्यामुळे दळवींची ही दुटप्पी भूमिका गोगावलेंना कधी कळलीच नाही. आता मात्र आमदार दळवी यांना मंत्री पद मिळावे, अशी मागणी दळवींचे बगलबच्चे यांनी एका कार्यक्रमात केली आहे. त्यामुळे गोगावलेंच्या पालकमंत्री पदाला दळवींचीच अडकाठी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोगावले आणि तटकरे यांच्या भांडणे लावून दळवी त्यांची पोळी भाजण्याचे काम करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शिंदे गटातील दळवी हे भरत गोगावल यांच्यासाठी घर भेदी ठरू शकतात, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
गोगावले यांना मंत्रीपद मिळण्यासाठी दळवींचा अडथळा?
