काँग्रेस नेते डॉ. मनिष पाटील यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा
| उरण | वार्ताहर |
हेटवणे ते नवी मुंबई यामार्गावरील सिडकोची प्रशासनाची जलवाहिनी फुटल्यामुळे घरांना पाणी घुसून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सिडको प्रशासन टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ येत्या सोमवार दि.19 पासून महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीचे सदस्य डॉ. मनीष पाटील हे उरण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
दिघोडे येथे हेटवणे नवी मुंबई मार्गावरील सिडकोची जलवाहिनी फुटल्याने त्यामुळे बाहेर पडणार्या पाण्याच्या प्रवाहात दिघोडे गावानजीक पाईपलाईन जवळ असलेल्या घरांना पाणी घुसून त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत सिडको प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही सिडको प्रशासन भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहे. यामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी येत्या सोमवार 19 सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा म पाटील यांनी दिला आहे.