| उरण | वार्ताहर |
पेण तालुक्यातील खरोशी गावातील स्वयंभू केळंबा देवीच्या मंदिरातील पेटी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत फोडण्याचा प्रयत्न केला. सदर चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. त्याचा हा डाव असफल झाला आहे. सदर घटना ही शनिवारी ( दि17) रात्रीच्या सुमारास घडली असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस यंत्रणेने तात्काळ सदर चोरट्यांचा तपास लावावा अशी मागणी भाविकांकडून व खरोशी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.