ताकई येथील इमारतींच्या सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान

प्रदुषणामुळे ग्रामस्थ आक्रमक, आंदोलनाचा इशारा
। खोपोली । प्रतिनिधी ।
नगरपालिका हाद्दीतील ताकई गावाजवळ बाँझर सेलिब्रेशन, निओ रेसिडन्सी, रिद्धी-सिध्दी तसेच अंडर होम या नामांकित सोसायट्यांमध्ये सुमारे हाजारो कुटूंब राहत आहेत. येथील मलयुक्तसांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारच नसल्यामुळे सांडपाणी शेतात पसरल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून दुर्गंधीयुक्त प्रदुषणामुळे स्थानिक ग्रामस्थ आक्रामक होते तातडीने उपाययोजना करा अन्यथा तिव्र आंदोलन करू असा इशारा अँड.रामदास पाटील यांनी दिला आहे.

पुणे एक्सप्रेसवेचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे बाँझर सेलिब्रेशन,निओ रेसिडन्सी, रिद्धी-सिध्दी तसेव अंडर होम या नामांकित सोसायट्यांमध्ये सुमारे हजारो कुटूंब राहत आहेत. पालिका लाखोचा कर वसूल करीत असतानाही सांडपाण्याची कोणतीही व्यवस्था केली नसल्यामुळे सर्व सोसायट्यांचा मलयुक्त सांडपाणी रासरोपणे शेतात सोडले जात आहे. गावातील जमिनधारकांचे शेतीमध्ये जात आहे. त्यामुळे शेतीमध्ये दुर्गंधीयुक्त प्रदुषण झाल्यामुळे शेतकर्‍यांना शेतीची कामे करणे फार कठीण झाले आहे.

शेतीत दिवसेदिवस नुकसान होवून त्या दुषित सांडपाण्यामुळे शेतीमध्ये गवत, किडा, मुंगी, साप, जन-जनावरे, उंदीरांना उपद्रव देणारे प्राणी निर्माण झाले आहेत. तसेच अनेक प्रकारचे जीवजंतु निर्माण झाले आहेत. हा सर्व त्रास व नुकसान वर नमुद केलेल्या इमारतीमधील आम्हाला होत आहे. अनेकदा सांगुन त्यांनी सदर दुषित सांडपाण्या की व्यवस्था आजपर्यंत केली नाही. त्यांचे या दुषित आम्हा शेतकर्‍यांना शेतीची मशागत करता येत नाही. शेतीमधुन कुठलेही पिक घेता येत नाही. त्यामुळे आमचे प्रत्येकाचे लाखो रुपयाचे नुकसान आहे. तसेच आरोग्याचा प्रश्‍ननर्माण झाला आहे असे निवेदन पत्र अँड. रामदास पाटील, हितेन पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी मुख्याधिकारी अनुप दुरे, तहसिलदार आयुब तांबोली यांना दिले आहे. सदरील हाऊसिंग सोसायट्यांना दुषित सांडपाण्याची योग्य व्यवस्था करणेस सांगण्यात यावे आणि आमचे शेतीचे होत असलेले अतोनात नुकसान करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन करू असा इशारा अँड. रामदास पाटील यांनी दिला आहे.

Exit mobile version