अवकाळी पावसाने बागायतदाराचे नुकसान

। रेवदंडा । वार्ताहर ।
अचानक हवामानात बदल घडून आल्याने वारा, पावसामुळे चौल-रेवदंडयातील सुपारी व्यापारी व बागायतदार यांना अतोनात नुकसानीस सामोरे जावे लागले. अवकाळी आलेल्या पावसाने बेसावध असलेले सुपारी व्यापारी व बागायतदार यांच्या सुपारीस पाणी लागल्याने मोठी झळ बसली आहे. सुपारी झाडावरून उतरवण्यात आलेल्या सुपारीना पाणी लागल्याने सुपारीचे नुकसान झाले असून अगदी कमी किमंतीत व्यापारांना विक्री करावी लागेल अशी खंत येथील बागायतदारांनी व्यक्त केली. तर सुपारी व्यापारी यांनी स्वतंचे फंडात ठेवलेली सुपारी पावसाने भिजल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. बागायततीतून सुपारी रेवदंडा व चौल मधील घाऊक व्यापारी खरेदी करत असतात, फंडाच्या माध्यमातून ही खरेदी केलेली सुपारी उन्हात ठेवून सुकवली जाते. परंतू अवकाळी पावसाने या सुपारीस पाणी लागल्याने सुपारी विक्रीस योग्य भाव मिळणार नसल्याचे येथील सुपारी व्यापारी सुरेश घरत-कोटकर यांनी सांगितले. चौल व रेवदंडा परिसरातील बागायतदार व व्यापारी यांनी प्रत्येक वर्षी निसर्गाच्या लहरीपणानेे अवकाळी पावसाच्या फटक्याने मोठे नुकसानीस सामोरे जावे लागते.

Exit mobile version