सुशोभीकरणाच्या कामामुळे वीज वाहिन्यांचे नुकसान

| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |

सध्या मुरुडमधील समुद्रकिनारा सुशिभिकरणाचे काम जोरदार सुरु आहे. काही भागात गटार लाईनचे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदण्याचे काम सुरु आहे. समुद्रकिनारी भागातून जमिनीच्या आतून 22 के.व्ही मोठी कॅबेल गेली आहे. जर का या लाईनला धोका पोचल्यास समुद्रकिनारा व दरबार रॉड लाईन या भागातील वीज जाण्याची दाट शक्यता आहे. या केबलना खरचटलेसुद्धा आहे. त्यामुळे हा धोका अधिक बळावला आहे.

यासाठी मुरुड नगरपरिषदेने समुद्र किनाऱ्यांवरील गटाराचे काम लवकरात लवकर करून घेणे आवश्यक आहे. खड्डा करून कित्येक दिवस तसाच ठेवल्याने या केबलना धोका अधिक पोहचण्याची शक्यता आहे. भूगर्भातील वीज वाहीनीला धोका पोहचल्यास या भागातील लोकांना अंधारात राहण्याची वेळ येऊ शकते. यासाठी मुरुड नगरपरिषदेने सर्वात प्रथम गटारांचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे. याबाबत मुरुड नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता चिदानंद व्हटकर यांनी सांगितले कि, 22 केव्हीची वीज वाहीनी गटार लाईनपासून दूर घेण्यात येणार आहे. ही वीजवाहिनी महावितरण अधिकारी व नगरपरिषदेच्या माध्यमातून दूर हटवणार आहोत. याबाबतचे काम सुरु असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Exit mobile version