| रसायनी | वार्ताहर |
महिलांची असुरक्षितता व महिलांवरील वाढते अत्याचार विचारात घेता रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या प्रयत्नाने व पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सहकार्याने महिलांच्या सुरक्षिततेसाठी रसायनीत दामिनी पथक स्थापित झाले आहे. या पथकामुळे महिलांवर होणारे अत्याचार दूर होणार आहेत.
रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात महिला उदरनिर्वाहासाठी नोकरी करत असतात. या महिलांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. त्यात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य होऊ नये म्हणून रसायनी पोलीस ठाण्यातर्फे दोन महिला पोलीस कर्मचारी 24 तास कार्यान्वित करण्यात आल्या असून, आता कोणत्याही महिला अथवा मुलीवर कोणीही त्रास देत असेल तर 112 नंबरवर फोन केल्यास तात्काळ दामिनी पथक याठिकाणी हजर राहून महिलेला सुरक्षा देण्याचे काम करणार आहे. दामिनी पथक स्थापित झाल्यामुळे परिसरातील महिला व मुलीवर सुरक्षित असल्यासारखे त्यांना वाटत असून, यामुळे या उपक्रमाचे कौतुक केले आहे.