वीज पडण्याचा इशारा देणारे अॅप विकसित
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पावसाळा सुरु होतोय, त्याच बरोबरच आकाशातून कडाडणार्या विजांचा आवाजही आता कानावर पडणार आहे. डोळे दिपवून टाकणार्या या शलाकाचा तडाखाही तितकाच जोराचा असतो. ती कुठे आणि कधी कोसळेल याचा नेम नसतो. त्यात अनेकदा वीज कोसळून जिवीत हानी झाल्याच्या दुर्घटनाही राज्यात सर्वत्र घडल्या आहेत.पण आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वीज नेमकी कुठे कोसळणार आहे याची माहिती देणारे दामिनी अॅप आता प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेले आहे. हे अॅप म्हणजे कडाडणार्या शलाकाच्या आगमनाचा दामिनी देणार इशारा असेच आहे.
वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरु आहेतच. तथापि यावरचा एक उपाय म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था (आयआयटीएम) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता हे अॅप विकसित केले आहे. दामिनी पसाठी आयआयटीएमने लाइटनिंग लोकेशन नेटवर्क हे मॉडेल विकसित केले आहे. या अॅप च्या माध्यमातून त्यांच्या परिसरातील वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाज पंधरा मिनिटे ते अर्धा तास आधी नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे वादळी वार्यांसह येणारा पाऊस आणि वीज पडल्यामुळे होणारी नागरिकांची जीवितहानी टाळणे शक्य होणार आहे.
मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच विशेष करुन ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. यामध्ये विशेषतः शेतकरी व शेत मजूरांची संख्या अधिक आहे. विजांसह होणार्या पावसाचे पूर्वानुमान शेतकर्यांना व नागरिकांना काही वेळ अगोदर समजावे, यासाठी हे दामिनी अॅप उपयोगी ठरणार आहे.
अॅपमधून मिळणार इत्यंभूत माहिती
हे अॅप जीपीएस लोकेशनने काम करीत असून वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी या अॅप मध्ये प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्राची दिशादर्शक स्थिती दर्शविण्यात येते. विजा पडण्याची शक्यता तसेच वीज म्हणजे नेमके काय, वीज कोसळणे याची शास्त्रीय माहिती आणि विजेपासून वाचण्यासाठी नागरिकांनी काय करायला पाहिजे, याचीही सविस्तर सचित्र माहिती दामिनी अॅप मध्ये देण्यात आली आहे. या अॅप वर लोकेशन टाकल्यानंतर संबंधित भागात वादळी वारे अथवा विजेच्या गडगडांची शक्यता असल्यास ती माहिती बघायला मिळते. त्यामुळे या माहितीच्या आधारावर शेतकरी व नागरिक वेळीच सावध होऊन त्यांचा जीव वाचवू शकतात.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी आणि नागरिकांनी हे प गुगल प्ले स्टोर मध्ये ऊराळपळ damini lightning – leter असे टाईप करून डाऊनलोड करावे. स्थानिक पातळीवर गावस्तरीय कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, शिक्षक, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही हे प स्वत: डाऊनलोड करावे तसेच सामान्य नागरीक, शेतकरी यांनाही हे प डाऊनलोड करण्यास मार्गदर्शन करावे.
– डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी