तिसर्‍या लाटेचा धोका, पण लसीकरण ठप्प

| रोहा | प्रतिनिधी |
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना आखण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पण, रोहा तालुक्यात मात्र लस उपलब्ध नसल्याने तालुक्यातील लसीकरण दोन दिवसांपासून ठप्प झाले आहे.

तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र अशा नऊ ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तालुक्यातील सुमारे 18 हजार लोकांना आतापर्यंत लस देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तालुक्यात लसीकरणासाठी जनतेच्या रांगा लागत आहेत. पण, लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने नागरिकांना लस मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अनेकजण लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत, पण लस नसल्याने त्यांच्या चिंतेत वाढ होत आहे.

Exit mobile version