। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन शहर हद्दीतील वालवटी रस्त्यावरील पूल हा खराब होत चालला आहे. पुलाचा एक भाग पूर्णपणे ढासळला आहे. वेळोवेळी तक्रारी करुनही सदरच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पत्र नगरसेवक अनंत गुरव यांनी श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना नुकतेच लिहिले आहे. या पत्रात ते गुरव यांनी लिहिले आहे की, सदर पुलाच्या बाजूला श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठान सभागृहामध्ये बैठकीच्या माध्यमातून निरुपण केले. त्याकरिता तेथे माणसांची व वाहनांची गर्दी होत असते. तसेच पुढे दिवेआगर व बोर्ली येथे जाण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा चालू असते. तरी लवकरात लवकर सदर पुलाची दुरुस्ती करुन मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.







