| गोवे-कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग 66 वरील पुई ग्रामपंचायत हद्दीतील महीसदरा नदीपात्रावरील अखेरची घटका मोजणारा पूल प्लास्टर पॅरिस व रंगरंगोटी करुन नवीन बनविला खरा; परंतु हा पूल नवीन बनविण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला असून, शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया गेल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या पुलावर काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे मोठा खड्डा पडला असून, यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या पुलाची अवस्था पाहता सावित्री नदीवरील दुर्घटनेची पुनरवृत्ती होईल काय, अशी प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.