| नेरळ | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील कळंबोली येथे झालेल्या रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शनात कर्जत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी बक्षिसांची लयलूट केली. तालुक्यातील सात विभागात प्रथम क्रमांक मिळविले आहेत.
रायगड जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, रायगड, गणित विज्ञान अध्यापक मंडळ आणि सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली न्यू पनवेल येथे जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या विज्ञान प्रदर्शन समारोप बुधवारी (दि.31) झाला. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातून प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थी आणि शिक्षक प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. विज्ञान पूरक निबंध स्पर्धेत आर्या सुर्वे एल ए इ एस इंग्लिश मिडीयम स्कूल नेरळ या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आला. तर वक्तृत्व स्पर्धेत अभिनव प्रशालेची आरुषी घावट प्रथम तर माध्यमिक गटात आर्या सुर्वे एल ए इ एस इंग्लिश मौडियम स्कूल नेरळ ही विद्यार्थिनी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
आदिवासी विभाग प्राथमिक गटामध्ये स्वप्निल पिरकड अनुदानित आश्रम शाळा माणगाववाडी यांचा प्रथम क्रमांक तर माध्यमिक गटात केतन दरवडा अनुदानित आश्रम शाळा माणगाववाड़ी यांची प्रतिकृती जिल्ह्यात अव्वल ठरली. आरोग्यासाठी मोकळा श्वास प्राथमिक गट विद्यार्थी प्रतिकृती इयत्ता सहावी ते आठवी तृतीय क्रमांक मिळाला. त्यात सायली मुंढे एल ए इ एस इंग्लिश मीडियम स्कूल हि विद्यार्थ्यीनी होती. तर उत्तेजनार्थ अभिनव शाळेची आरुषी घावट हिच्या पेरणी व खुरपणी यंत्र या प्रतिकृतीला देण्यात आले.
नववी ते बारावी गटात एलए ईएस शाळेची आर्या मिलिंद सुर्वे हिने प्रथम क्रमांक मिळविला. यातील आदिवासी विभागातील प्राथमिक आणि माध्यमिक प्रतिकृती तसेच प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थी प्रतिकृती या राज्यस्तरिय विज्ञान प्रदर्शन 2023-24 साठी निवडले आहेत. या चारही प्रतिकृतींना कोकण विभागीय विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.