। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा केळघर मार्गे मुरुड हा रस्ता दरवर्षी पावसाळ्यात बंद होत असतो. दोन दिवस रोहा तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रोहा, केळघर मार्गे मुरुड या रस्त्यावर मोठ्या दरडी माती सैल झाल्याने रस्त्यावर आल्या आहेत. यामुळे सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. जंगलातून असणार्या या घाट मार्गावर सुंदर असे सृष्टीसौंदर्य पाहण्यास मिळत असल्याने या मार्गावर पर्यटकांची रेलचेल असते. सदर मार्ग पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रयत्न सुरू आहेत.