कुस्तीपटूंचा काळा दिवस

| नवी दिल्ली | वार्ताहर |

कुस्तीपटूंनी गुरुवारी बृजभूषण सिंहाविरोधात काळा दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. आज कुस्तीपटू स्वत: काळी पट्टी बांधून आंदोलन करत आहेत. कुस्तीपटूंनी लोकांना हा काळा दिवस साजरा करण्यासाठी समर्थन करण्याचे आवाहन देखील केले आहे. कुस्तीपटूंच्या या भूमिकेचे पडसाद सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. सध्या सोशल मीडियावर काळा दिवस चांगलाच चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि इतर कुस्तीपटूंनी काळा दिवस साजरा करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Exit mobile version