दिवे लवकर सुरू करण्याची मागणी
| खरोशी | प्रतिनिधी |
मुंबई- गोवा महामार्गावरील NH-66 वरील रामवाडी पेण ब्रिज तसेच हमरापुर, तरणखोप, जिते रामवाडी परिसरातील अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या महामार्गावरील विद्युत दिव्यांबाबत इंजि. जीवन शंकर पाटील यांनी सातत्याने मागणी करून सदर महामार्गावरील पथदिवे लवकरात लवकर चालू करावे अशी मागणी केली आहे.
याबाबत (दि. 8) डिसेंबर 2025 रोजी नॅशनल हायवे अथॉरिटी, पनवेल यांना अधिकृत ई-मेलद्वारे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यात आले होते. ई-मेल व्यतिरिक्त फेसबुक व ट्विटर (X) या सोशल मीडिया वरूनही वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी व पाठपुरावा करण्यात आला. विशेष म्हणजे विभागाने ई-मेल प्राप्त झाल्याचे मान्य केले असले तरी कोणताही लेखी प्रतिसाद देण्यात आलेला नव्हता.
दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी रामवाडी-पेण ब्रिजवरील काही दिवे सुरू करण्यात आले. मात्र, समस्या पूर्णपणे निकाली न लागल्याने पाठपुरावा अखंड सुरू ठेवण्यात आला. महामार्गावरील अंधार हा नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारा मुद्दा आहे. अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित वाहतुकीसाठी प्रकाश व्यवस्था नियमित व कायमस्वरूपी सुरू राहणे अत्यावश्यक आहे. जीवन पाटील यांनी प्रशासनाचे आभार मानत सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा सर्वोच्च प्राधान्याचा असावा. दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण व्हावे आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, हीच अपेक्षा.
मीटर कनेक्शन संदर्भातील तांत्रिक अडचणीमुळे दिवे बंद आहेत. संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची प्रक्रिया सुरू असून, फेब्रुवारी अखेरीस रामवाडी-पेण ब्रिजपुरतेच नव्हे तर हमरापुर, तरणखोप जिते-रामवाडी परिसरासह संबंधित राष्ट्रीय महामार्गावरील सर्व विद्युत दिवे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येतील.
-निखिल कुमार
उपअभियंता, पीडब्ल्यूडी
