वावोशी उपसरपंचपदी दर्शना हातनोलकर

| वावोशी | वार्ताहर |
वावोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दर्शना हातनोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच सुनीता भालेराव यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणूक प्रक्रियेचे अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच प्रभाकर छत्तीसकर यांनी काम पाहिले. या वेळी वालचंद ओसवाल ,राम वाघमारे, महेश कडू, रंजना कडू, प्रल्हाद शिंदे, मालती पाडगे, कार्यकर्ते जयंत टिळक, वसंत वालम, तानाजी शिंदे, दिनकर हातनोलकर, मुरलीधर कडू, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version