। वावोशी । वार्ताहर ।
वावोशी गावातील संत विचारांचे अनुयायी पांडूरंग काशिनाथ हातनोलकर यांचे निधन झाले आहे. निधनासमयी ते 90 वर्षांचे होते. संत तुकाराम महाराजांचे अभंग त्यांचे तोंडपाठ होते. त्यांच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा करताना ते संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील चरणाचा दाखला देऊन ते त्या विषयाचे स्पष्टीकरण देत असत. त्याचप्रमाणे त्यांना शिल्पकला देखील अवगत होती. त्यांनी वावोशी गावातील शंकर मंदिरातील पिंड व नंदी बैलाचे शिल्प साकारले आहे. त्यांच्या पश्चात एक भाऊ, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या दशक्रिया विधी मंगळवारी (दि.1) साजगाव येथील श्री क्षेत्र धाकटी पंढरी येथे होणार आहे. तर, उत्तरकार्य शुक्रवारी (दि.4) वावोशी येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे. यावेळी सकाळी साडेदहा वाजता काशिनाथ वाघुले महाराज यांचे प्रवचन देखील होणार असल्याचे हातनोलकर कुटूंबियांकडून सांगण्यात आले आहे.