। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या कडाव इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुंबई विज्ञान परिषद यांच्या माध्यमातून विज्ञान खेळणी बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांना शाळेतील माध्यमिक विभागातील पूर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सुरवातीला मुख्याध्यापिका वृषाली वैद्य यांनी मुंबई विज्ञान परिषदेकडून आलेल्या प्रशिक्षकांची ओळख करून दिली. यानंतर विद्यार्थ्यांना खेळणी संच बनविण्याचे साहित्य देण्यात आले. मुंबई विज्ञान परिषदेकडून नेमण्यात आलेल्या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना विज्ञान खेळणी बनविण्यास शिकविले गेले. या कार्यशाळेत 124 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी मुलांनी आनंदाने खेळणी तयार केली. या उपक्रमामुळे शाळेमधील विज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची विज्ञान खेळणी बनवून विज्ञान अधिक सोपे करून घेण्याचा प्रयत्न केला.