कर्जतमध्ये दत्त जयंती साजरी

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील श्री दत्त मंदिरात शनिवारी (दि.18) दत्त जयंतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भक्तांनी दत्त जयंतीनिमित्त तालुक्यातील दत्त मंदिरात गर्दी केली होती. नेरळ येथील गुरुदत्त मंदिरात अखंड ज्ञानयद् सोहळा आयोजित करण्यात आला होता.
तालुक्यातील वाकस येथील श्री गणेश मंदिरात दत्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. नेरळ पासून परिसरातील 30 हुन अधिक गावातील भक्तांनी या मंदिरात जाऊन दत्त जयंतीनिमित्त श्री दत्ताच्या मूर्तीचे दर्शन घेतले.आयोजक रोहिदास मोरे यांच्याकडून सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. नेरळ गावातील चिंचआळी येथील श्रीगुरुदत्त मंदिरात अखंड नामयद्न सोहळा आयोजीत केला होता. तेथे आज नेरळ गावातील भक्तांनी श्री दत्तांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

Exit mobile version