। अलिबाग । वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे दत्तजयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त श्रीपंत भक्त मंडळातर्फे शुक्रवार, दि. 13 व शनिवार, दि. 14 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी (दि. 13) वाघोडे येथे सकाळी 7 वाजता अवधूत मठ येथे ध्वजारोहण, सकाळी 8 वाजता अवधूत मठ येथून औदुंबर कट्टामार्गे नागझरीमधून प्रेमध्वज फेरी काढून वाघोडे येथे येईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता महाप्रसाद तसेच दुपारी 2 वाजता प्रेमध्वज फेरी वाघोडेे येथून निघून बांधणमार्गे दत्तमंदिर पेझारी येथे येईल. तर, पेझारी येथे सकाळी 7 वाजता दत्तमंदिर येथून प्रेमध्वज पालखीचे प्रस्थान होईल. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता दत्त मंदिरासमोर ध्वजारोहण करण्यात येईल.
शनिवारी (दि. 14) पहाटे 4 वाजता श्रींची पूजा व अभिषेक होईल. त्यानंतर 5 वाजता दत्तात्रेय सहस्र नामावली पठण करण्यात येईल. त्यानंतर सकाळी 8 वाजता दत्तमंदिर येथून पालखीचे प्रस्थान होईल. दुपारी 1 वाजता पालखीचे आगमन होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता श्रींचा जन्मोत्सव सोहळा आणि सायं. 7 वाजता प्रेमळ सुनंदाताई राणे महिला मंडळ, पेझारी यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री 8.30 वाजता दत्त प्रेमलहरीमधील पदांवर टिपरी नृत्य होणार आहे. रात्री 10 वाजता आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.