पत्रकार संघाच्या सचिवपदी दत्तात्रेय म्हात्रे

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण तालुका दैनिक पत्रकार संघाचे जीवन गोपाळ केणी यांची उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तिसर्‍यांदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. तर, पत्रकार संघाच्या सचिवपदी दत्तात्रेय म्हात्रे यांचीदेखील सलग दुसर्‍यांदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी दिनेश पवार यांची वर्णी लागली आहे.

संघाचे अध्यक्ष जीवन केणी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.3) उरण येथील शासकीय विश्रामगृहात ही वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. खेळीमेळीच्या व सामंजसपणाच्या वातावरणात जुन्याच पदाधिकार्‍यांसह कार्यकारिणी सदस्यांची ही एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. यात मधुकर ठाकूर, जगदीश तांडेल, प्रदीप पाटील, सुभाष कडू आदींची कार्यकारणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी उरण तालुका अभिनव सेवा सहकारी संस्थेचीही वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी दोन्ही संघांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील इतिवृत्ताचे वाचन व जमा खर्च सादर करण्यात आला. यानंतर सभेत विविध विषय मांडून ठरावही मांडण्यात आले.

Exit mobile version