| रायगड | खास प्रतिनिधी |
यशश्री शिंदे हत्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेला आरोपी दाऊद शेखच्या पोलीस कोठडीत 13 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. बुधवारी दाऊदला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
25 जुलै रोजी यशश्री शिंदेची हत्या दाऊद फरार झाला होता. या घटनेने अख्या महाराष्ट्राला हादरवले. आरोपी दाऊदला पोलिसांनी गुलबर्गा येथून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दाऊदला गुरुवारी न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. परिस्थितीचे भान राखत आणि हत्येचे प्रकरण अतिसंवेदनशील असल्याने पोलिसांनी न्यायालयाला तशी विनंती केली होती. या हत्या प्रकरणातील आणखी काही पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडी मागितली होती. राज्यभरातून या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत असून, संतप्त नातेवाईकांसह नागरिकांनी दाऊद शेखला फाशी देण्याची मागणी केली आहे.