कोलाड येथे खळबळ
कोलाड | कल्पेश पवार |
मुंबई -गोवा महामार्ग जवळील कोलाड आंबेवाडी नाका या रहदारीच्या चौकात ३५ वर्षीय इसमाचा मुत्यु देह आढळून आल्याची घटना कोलाड मध्ये गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली.
तरी या विषयी पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहिती नुसार गुरुवार दि.५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास विलास सखाराम जाधव वय.३५ रा. पोलादपूर सध्या राहणार वागले इस्टेट शांतीनगर हे कोलाड आंबेवाडी नाका या रहदारीच्या चौकात पाणपोई जवळ रोडवर पडलेले बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने त्यांस प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी येथे नेले असताना डॉक्टरांनी त्याना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय रोहे येथे नेण्यास सांगितले सदर डॉक्टरांनी त्यास तपासुन मयत घोषित केले.
तर हा अपघात की घातपात अशी उलट सुलट चर्चा कोलाड मध्ये दिवसभर रंगली होती.परंतु त्याचा मुत्यु हा त्याला कोणत्यातरी असलेल्या आजाराने झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांत यांची आकस्मिक मुत्यु अशी नोंद करण्यात आली असून ,या पुढील तपास कोलाड सपोनि सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एस.आर .म्हात्रे, पी जी पाटिल करीत आहेत.