पोहताना बुडून मुत्यू

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील विहूर गावात एका विहिरीत मामा आपल्या भाच्याला पोहाणी शिकवत असताना मामाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मुत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील विहूर गावात नदीम पांगारकर वय 27 वर्ष हे आपल्या घरामागील असणार्‍या विहिरीमध्ये त्यांचा भाचा वय 14 वर्ष याला पोहावयास शिकवत होते. पोहाणी शिकवत असताना दमछाक झाल्याने मामाचा पाण्यात बुडून मुत्यू झाला तर वेळीच मदत मिळाल्यामुळे भाच्याला वाचवण्यात यश प्राप्त झाले आहे. भाच्याला पुढील उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version