सोगाव बालग्राममधील मुलाचा मृत्यू; शिस्तभंगाची शिक्षा जीवावर बेतल्याची चर्चा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील बालग्राममधील 11 वर्षीय मुलाचा गुरुवारी न्यूमोनियाने मृत्यू झाला. यश विजय सानिकर असे या मुलाचे नाव आहे. शिस्तभंग केल्याने या मुलाला प्रशिक्षकानी पावसात उभे राहण्याची शिक्षा केली. त्यामुळेच यशला न्यूमोनिया झाला असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत डायरेक्टर राकेश सिन्हा यांना विचारणा केली असता त्या मुलाच्या आणखी काही आरोग्यविषयक तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यूमोनियाची लागण झाल्यामुळे दि. ६ सप्टेंबर रोजी यश सानिकर यास अलिबागमधील धामणकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यास पनवेल येथील रुग्णालयात पुढिल उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुर्ण शरिरात न्यमोनियाचा फैलाव झाल्याने त्याच्या फुफ्फुसांवरही परिणाम झाला. तसेच गुरुवारी सायंकाळी त्याची मृत्यूशी झुंज संपली.

राकेश सिन्हा, डायरेक्टर, बालग्राम
Exit mobile version