विंचू दंशाने विवाहितेचा मृत्यू

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

संगमेश्‍वर तालुक्यातील मानसकोंड येथील विंचू दंश झालेल्या 26 वर्षीय विवाहितेचा भाऊबीजेच्या दिवशीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंजिरी वैभव फेपडे असे या महिलेचे नाव आहे. मंजिरीला विंचू दंश झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तिला अचानक श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी तिला कोल्हापूर येथे हलवण्यास सांगितले होते. कोल्हापूर येथे उपचारासाठी नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. तिला दीड वर्षाची मुलगी असून तिच्या मृत्यूमुळे मानसकोंड गावावर शोककळा पसरली आहे.

Exit mobile version