। रत्नागिरी । प्रतिनिधी।
रत्नागिरीतील आरे- वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. बुडालेल्या दोघांना स्थानिक ग्रामस्थ आणि येथील पोलिस पाटील आदेश कदम यांनी बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
संतोष शशिकांत भानुशाली असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते पालघरचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सुयोग राजेश भानुशाली असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. पालघर येथून हे कुटुंब रविवारी सकाळी आरे वारे येथे दाखल झाले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोघे समुद्रात बुडाले. यातील एकाचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं.







