महाडमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
महाड येथील काळीज गावाच्या हद्दीत मित्राला त्याच्या घरी सोडून वेरखोले येथे एमआयडीसी हायवेने परतत असताना टीव्हीएस दुचाकीवरील (क्र.एमएच 06 सीसी 9502) ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या खाली कोसळून अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. याबाबत महाड एम.आय.डी.सी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार पवार हे करीत आहेत.

Exit mobile version