आकडी येऊन गर्भवती महिलेचा मृत्यू

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती असलेल्या महिलेवर सिझेरिअन शस्त्रक्रिया झाल्यावर तिला जनरल वार्डमध्ये बाळासह दाखल करण्यात आले होते. याठिकाणी अचानक तिला आकडी व घाम येऊन तिचा मृत्यू झाला ही मंगळवार दि.9 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे घडली.याबाबाबतची खबर सुवर्णा अंकुश साळवी रा.पिटसई कोंड ता.तळा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

Exit mobile version