| खोपोली | प्रतिनिधी |
वावोशीफाटा या गावाशेजारून वाहणाऱ्या बाळगंगा नदीवर पोहण्यासाठी गेलेला भुवनेश्वर खणेश्वर बोरो (28) मूळ आसाम यांचा तोल जाऊन नदीपात्रात पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा पाण्यातील मृतदेह शोधण्यासाठी खोपोली येथील अपघातग्रस्त टीम तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांना पाचारण करण्यात आले होते.
सकाळी या सदस्यांनी आपली शोध मोहीम सुरू केल्यानंतर लगेचच त्यांचे शव त्यांच्या हाती लागले. याबाबत खालापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंदनुसार दाखल करण्यात आली असून त्याचा पुढील तपास वावोशी दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार सांगळे करीत आहेत.