| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पॅलेस्टाईनमधील भारतीय राजदूत मुकूल आर्य यांचा मृतदेह आढळून आला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही माहिती दिली आहे. आर्य यांच्या निधनाचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. आर्य हे 2008 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी होते. ते काबूल आणि मॉस्कोमधल्या भारतीय दूतावासातही काही काळ तैनात होते. तसेच पॅरिसमध्ये युनेस्कोच्या भारतीय स्थायी प्रतिनिधिमंडळातही त्यांनी काम केले होेते.