संतोष सुतार यांना पितृशोक

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव तालुक्यातील पळसगाव खुर्द गावचे रहिवासी असलेले पत्रकार संतोष सुतार यांचे पिताश्री कै. पांडुरंग महादेव सुतार यांचे बुधवारी (दि. 17) पळसगाव खुर्द येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सुतार कुटुंबियांवर व पळसगाव खुर्द ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर पळसगाव खुर्द येथील स्मशानभूमीत बुधवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यसंस्काराला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांचा दशक्रिया विधी शुक्रवारी (दि. 26) उत्तरकार्य, रविवारी (दि. 28) राहते घरी पळसगाव खुर्द येथे होणार असल्याचे संतोष सुतार यांनी सांगितले.

Exit mobile version