सखुबाई मोकल यांचे निधन

। शिहू । वार्ताहर ।

शिहू येथिल सखुबाई सखाराम मोकल यांचे रविवारी (दि.11) वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. नागोठणे विक्रम चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मनोज मोकल व सेवानिवृत्त रायगड पोलीस गंगाराम मोकल यांच्या त्या आई होत्या. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवारी (दि.20) पाली उद्धर येथे होणार असुन उत्तरकार्य गुरूवारी (दि.22) शिहू येथिल राहत्या घरी होणार आहे. त्यांच्या पच्छात चार विवाहित मुली, दोन मुलगे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

Exit mobile version